Border 2 : सनी देओलच्या गदर २ यशानंतर बॉर्डर २ साठी जेपी, निधी दत्ता सज्ज

border
border

पुढारी ऑनलाईन डेस्क : जे पी दत्ता, निधी दत्ता सर्वात मोठा युद्धावर आधारित चित्रपट बॉर्डर २ येणार असल्याचे म्हटले जात आहे. ट्विटरवर हॅश टॅग बॉर्डर २ चा ट्रेंड सुरु आहे. (Border 2) बॉर्डर हा ऐतिहासिक ब्लॉकबस्टर भारतीय सिनेमा आहे. आणि आता त्याचा दुसरा भाग येणार असल्याची माहिती समोर आलीय. चित्रपटाची टीम २ -२ वर्षांपासून बॉर्डर सिक्वेल आणण्याविषयी चर्चा करत आहे. आता त्यांनी ऑफिशिअली कन्फर्म केले असून बॉर्डर २ ची घोषणा केलीय. (Border 2)

सूत्रांच्या माहितीनुसार, टीमने १९७१ मधील भारत-पाक युद्धाची आणखी एक कहाणी शोधली आहे, जी आतापर्यंत मोठ्या पडद्यावर दाखवली गेलेली नाही. ही कहाणी शानदार पद्धतीने दाखवण्यासाठी जेपी दत्ता, निधी दत्ता सज्ज आहेत. या चित्रपटाची तिर्मिती जेपी दत्ता आणि निधी दत्ता यांच्याद्वारे करण्यात येईल. ते बॉर्डर २ साठी एका टॉपच्या स्टुडिओसोबत भागीदारीची चर्चा करत आहेत. चित्रपटाची अधितृत घोषणेसाठी बातचीत सुरु असून लवकरच हे काम देखील पूर्ण होईल. चित्रपटाची कथा लेखनाची प्रक्रिया लवकरच सुरु होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news