Madha Lok Sabha : माढ्यात ‘वस्तादां’चे पॅचअप : शरद पवारांशी चर्चेनंतर देशमुखांचे बंड झाले थंड

अनिकेत देशमुख
अनिकेत देशमुख

सांगोला: पुढारी वृत्तसेवा : शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले होते. परंतु, ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एका रात्रीत राजकीय चक्र फिरवून देशमुख याचे बंड थंड केले आहे. Madha Lok Sabha

स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी त्यांच्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये खासदार शरद पवार यांना व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना नेहमीच सहकार्य केले होते. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरला आहे. विश्वासात घेतले नसल्याचे सांगून देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले होते.

परंतु, धैर्यशील मोहिते – पाटील यांनी आपले विश्वासू दीपक पवार यांना देशमुख यांच्या घरी पाठवले. व शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. गुरुवार सायंकाळी भेट घेण्याचे सांगितले. यामुळे राजकीय सर्व खलबते होऊन देशमुख यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय मागे घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याचे जाहीर केले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news