KL Rahul- Athiya Shetty : बॉलिवूडनंतर आता क्रीडाविश्वात लग्नसराई; केएल राहुल- अथिया शेट्टी लवकरच अडकणार विवाहबंधनात

KL Rahul with Athiya Shetty
KL Rahul with Athiya Shetty
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन  डेस्क : गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये लग्नसराई सुरू आहे. आता ही लग्नसराई क्रीडाविश्वातही पाहायला मिळणार आहे. लवकरच  भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांनाही याची उत्सुकता लागली आहे.

भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. सध्या तो आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. या संघात तो धडाकेबाज खेळी करतोय. नुकताच केएल राहुलचा वाढदिवस झाला. यावेळी अभिनेत्री अथियाने तिच्या सोशल मीडीयावर राहूल सोबतचे फोटो शेअर करत 'anywhere with you, happy birthday' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्यानी लग्नापूर्वीची ही झलक दाखवली आहे.

सोशल मीडियावर या दोघांचेही एकत्र अनेकदा फोटो व्हायरल झाले आहेत. अखेर हे दोघेही लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे दिसत आहे. याच वर्षाच्या अखेरीस दोघांचा विवाह होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Athiya Shetty (@athiyashetty)

क्रिकेटर के. एल. राहुल आणि अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी हे गेल्या 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.  या दोघांनी अनेकदा आपल्या नात्याची कबुलीही दिली आहे. सुनील शेट्टी हा मंगळुराच आहे. तसेच के. एल. राहुलचंही मंगळूरशी खास नातं आहे. त्यामुळे राहुल आणि अथियाचा लग्नसोहळा हा दाक्षिणात्य रितीरिवाजाप्रमाणे होणार असल्याचेही सांगण्यात येतंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul? (@rahulkl)

हेही वाचलत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news