Amavasya : तब्बल 993 वर्षांनी अद्भुत योग जुळून आला; पण अमावस्येमुळे…

Amavasya
Amavasya
Published on
Updated on

लंडन : पृथ्वीपासूनचे अंतर नेहमी एकसारखे नसते. चंद्राची पृथ्वीभोवतीची कक्षा वर्तुळाकार नसून लंबवर्तुळाकार असते. लंबवर्तुळाकार कक्षेमुळे, कधी चंद्र पृथ्वीपासून खूपच जवळ असतो, तर कधी फारच दूर असतो. (Amavasya) यावर्षी तब्बल 993 वर्षांनंतर असा योग जुळून आला की, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. शनिवारी म्हणजेच 21 जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ होता.

असा योग शेकडो वर्षांनंतर जुळून येतो. 21 जानेवारीला रोजी चंद्र आणि पृथ्वी एकमेकांच्या फार जवळ होते. मात्र, त्या दिवशी अमावस्या असल्यामुळे पृथ्वीच्या इतक्या जवळ असलेला चंद्र आपल्याला दिसला नाही. (Amavasya) आपल्या सौरमालेमध्ये पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा करते. तसेच चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो.

चंद्र लंब वर्तुळाकार आकारात पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालतो, त्यामुळे एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र (Amavasya) पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि एक वेळ अशी येतो जेव्हा तो पृथ्वीपासून सर्वात दूर असतो. या वर्षी तब्बल 993 वर्षांनंतर अशी वेळ आली जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला. याआधी ही खगोलीय घटना 1030 साली घडली होती. आता हा दुर्मीळ योग 345 वर्षांनी दिसणार असून चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असेल.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news