श्रद्धा हत्या प्रकरण: हल्ल्यानंतर आफताबच्या सुरक्षेत वाढ; कडक सुरक्षा व्यवस्थेत FSL कार्यालयात आणले

श्रद्धा हत्या प्रकरण
श्रद्धा हत्या प्रकरण

पुढारी ऑनलाईन : श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पुनावाला याला घेवून जाणाऱ्या पोलिसांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला. सोमवारी संध्याकाळी मधूबन चौकानजीक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर झालेल्या हल्ल्यानंतर, त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आज पुन्हा आरोपी आफताबला उच्च सुरक्षा व्यवस्थेत फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत (एफएसएल) कार्यालयात आणण्यात आले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत, हल्ला करणाऱ्या टोळीतील आरोपींना ताब्यात घेतले होते. यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनवण्यात आली आहे. हल्ला करणाऱ्या टोळीतील उर्वरित हल्लेखोर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी पोलिसांच्या न्यायालयीन कोठडीतील आरोपी आफताबला घेऊन जाणाऱ्या पोलिस व्हॅनवर सोमवारी रात्री हल्ला झाला. या हल्ल्यानंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) बाहेर मोठ्या प्रमाणात बीएसएफ जवान तैनात करण्यात आले आहेत. आफताबच्या सुरक्षेतेतही वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

असा झाला हल्ला

आफताबची पॉलीग्राफ टेस्ट करण्यासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीत (एफएसएल) आणण्यात आले होते. लॅबमधून पुन्हा तिहार कारागृहात घेवून जात असतांना हा प्रकार घडला. हल्लेखोरांनी हातात तलवार घेऊन पोलीस व्हॅनचा दरवाजा उघडत आफताबला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रसंगावधान राखत पोलीस कर्मचाऱ्यांनी पिस्तूल काढल्याने अनुचित प्रकार टळला. दरम्यान हल्लेखोरांनी हल्ला करताना आफताबविरोधी घोषणाबाजीही केला.

आरोपी हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा

या हल्ल्याचा एक व्हिडियो व्हायरल झाला असून, यामध्ये हल्लेखोर आफताबला घेवून जाणाऱ्या पोलीस व्हॅनमागे तलवार घेवून पळत असल्याचे दिसून येत आहे. सशस्त्र हल्लेखोर आफताबला व्हॅनबाहेर उतारण्याच्या प्रयत्नात होते. पुर्ण योजना आखून हल्लेखोर आले होते, असे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपींनी ते हिंदू सेनेचे कार्यकर्ते असल्याचा दावा केला आहे. आरोपींच्या वाहनातून काही शस्त्रे देखील पोलिसांनी हस्तगत केली आहेत.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news