२३० किलोच्या अदनान सामीच्या जीवनात राहिले होते १८० दिवस या माध्यमातून घटवले वजन

२३० किलोच्या अदनान सामीच्या जीवनात राहिले होते १८० दिवस या माध्यमातून घटवले वजन

पुढारी ऑनलाईन अदनान सामी यांचा आवाज आज प्रत्‍येक भारतीयाच्या ओळखीचा आहे. त्‍यांनी अनेक हिंदी गाणी म्‍हटली. त्‍यातील अनेक गाण्यात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून राणी मुखर्जीपर्यंतच्या तारखांचा समावेश होता. मुझको भी तो लिफ्ट करा दे.. हे गाणे विशेष लोकप्रिय झाले होते. याच अदनान सामी यांच्या जीवनात त्‍यांच्या वजनामुळे मोठे संकट आले होते. त्‍यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्‍यांना डॉक्‍टरांनी तुम्‍ही वजन कमी केले नाही, तर ६ महिन्यांच्यावर तुम्‍ही जगू शकणार नाही असे सांगितले होते. यानंतर मात्र अदनान यांनी जे केले ते सर्वांना थक्‍क करणारे होते.

अन् १२० किलो वजन घटवले..

अदनान सामी यांचे वजन २३० किलो झाले होते. बऱ्याच प्रयत्‍नानंतर त्‍यांनी काही वर्षापूर्वी यातील १२० किलो वजन कमी केले होते. अदनान सामी यांच्या ट्रान्स्‍फॉरमेशनने सगळेच अवाक झाले होते. वेटलॉसनंतर ते जेव्हा सर्वांच्या समोर आले तेंव्हा त्‍यांना ओळखणेही कठीण झाले होते. त्‍यांनी एका मुलाखतीत त्‍यांनी वजन कसे घटवले याबद्दल सांगितले होते.

माझ्यासाठी करो या मरोची स्‍थिती

अदनान यांनी एका मुलाखतीत सांगितले की, माझ्यासाठी करो या मरोची स्‍थिती निर्माण झाली होती. डॉक्‍टरांनी मला सांगितले होते की, मी वजन घटवले नाही, तर मी सहा महिन्यांपेक्षा अधिक जगू शकणार नाही.

छोट्या-छोट्या स्‍टेप्सनी सुरूवात 

अदनान म्‍हणाले, मग मी एका न्यूट्रिशनिस्‍टला भेटलो. त्‍यावेळी त्‍यांनी मला छोटे-छोटे स्‍टेप्स करायला सांगितले. मी या प्रवासाला सुरूवात केली. मला माहित नव्हते मी कुठवर डाएट फॉलो करू शकेन. मग यानंतर अदनानने वजन कमी करण्यासाठी आपली जीवनशैलीत अनेक बदल केले. यानंतर त्‍यांनी आपल्‍या ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. त्‍यांच्या प्रयत्‍नांना आणि मेहनतीला रंग येउ लागला आणि त्‍यांनी तब्‍बल १२० किलो वजन घटवले.

चाहत्‍यांसाठी सरप्राईज

अदनान यांनी डाएट आणि चालण्याच्या व्यायामातून जेंव्हा ४० किलोपर्यंत वजन कमी केले. तेंव्हा त्‍यांनी जीममध्ये व्यायाम सुरू केला होता. अदनान यांनी ४० किलो वजन घटवल्‍यावर ट्रेड मिलवर चालण्यास सुरूवात केली. त्‍यांनी हलक्‍या वजनापासून आपली वेट ट्रेनिंग सुरू केली. या दरम्‍यान ट्रेनर प्रशांत त्‍यांना आठवड्यातून सहा दिवस स्‍ट्रेन्थ ट्रेनिंग करून घेत होते. स्‍ट्रेन्थ ट्रेनिंगसोबतच सहा दिवस ते कार्डियोही करत होते. ज्‍यानंतर त्‍यांचे हळूहळू वजन कमी होत गेले. यानंतर जेंव्हा ते नव्या गाण्याच्या अल्‍बम मध्ये दिसले तेंव्हा चाहत्‍यांसाठी ते सरप्राईज होते. कारण त्‍यांच्या व्यक्‍तीमत्‍वात खूप मोठा बदल झाला होता.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news