पुढारी ऑनलाईन डेस्क : 'होणार सून मी या घरची' मालिकेत अभिनयाच्या ठसा उमठवणारी मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर सक्रिय असते. तेजश्रीने ( Tejashri Pradhan ) डॉ. प्रकाश बाबा आमटे चित्रपटातही भूमिका केल्यानंतर प्रकाशझोतात आली होती. चित्रपटाशिवाय तिने अनेक मालिकांमध्ये भारदस्त भूमिका साकारल्या आहेत. तेजश्रीचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. सध्या तेजश्री खूप दिवासांनी नवा प्रोजेक्ट घेवून येत असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान तिने जुन्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे.
अभिनेत्री तेजश्री प्रधानने ( Tejashri Pradhan ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटातील एका फोटो शेअर केला आहे. या फोटोत तेजश्री नववधूच्या वेशात दिसत असून तिच्या शेजारी अभिनेते डॉ. मोहन आगाशे दिसत आहे. यावेळच्या दुसऱ्या फोटोत तेजश्री साध्या वेशात आणि मोहन आगाशे तिच्याकडे पाहताना दिसत आहेत. परंतु, यातील खास म्हणजे, पहिल्या फोटोत तेजश्रीच्या कपाळावर फुलांच्या मुंडावळ्या, गळ्यात मंगळसूत्र आणि नेकलेस असा लूक दिसतो आहे. तर दुसऱ्या फोटोत तिच्या गळ्यात मंगळसूत्र किंवा आणखी काहीच दिसत नाही. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
या फोटोच्या कॅप्शमध्ये तिने 'You keep on meeting people in your life journey but only some of them just stay forever.. Mohan kaka thank you for always having my back??'. असे म्हटले आहे. या फोटोवर खास करून, '१२ वर्षांपूर्वीचा फोटो आणि १२ वर्षांनंतर त्याचं रिक्रेएशन. इतक्या वर्षांनी पुन्हा योग आला. परतु, तितकंच भारी फिलिंग आहे मोहन काका'. असे लिहिले आहे. यामुळे चाहत्यांनी अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. एकीकडे, 'तेजश्री पुन्हा बारा वर्षांनी लग्न करतेय काय?' तर दुसरीकडे 'तिचा आगामी काही चित्रपट येतोय काय?', 'तिने फक्त जुन्या आठवणींना उजाळा दिला' यासारखे अनेक प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केले आहेत.
'तेजश्री सध्या काय करते?', 'तुला नक्की काय म्हणायचे आहे', 'One of the legend of marathi cinema !!', 'Daddy relationship…. Nice, Mohan kaka ?', 'GREAT ?', 'U luk very honest n transparent human being…be happy keep smiling ??', 'Awwww ❤️', 'आता गोऱ्या झालाय तुम्ही ?', 'मस्त', 'खुप छान???छान', 'Big Beautiful Post ? Medam?', 'Waw nice ??', 'All the best ?', 'Amazing ??', 'उत्तम ❤️', 'गोंडस ❤️??', 'You looking so so beautiful mam??', 'This is really amazing ♥?'. यासारख्या अनेक कॉमेन्टस युजर्सनी केल्या आहेत. या फोटोला श्रेया बुगडेसह ४० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचा :