Animal Movie : तृप्ती डिमरीच्या इंटीमेट सीनसाठी साराने दिलं होतं ऑडिशन?; जाणून घ्या सत्य…

Animal Movie
Animal Movie

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा 'अॅनिमल' ( Animal Movie ) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा गाठला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूर यांच्या इंटिमेट सीन्सची खूप चर्चा झाली. दरम्यान, एका अहवालानुसार या भूमिकेसाठी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने तिच्या आधी ऑडिशन दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, ही माहिती अधिकृत्त आहे की नाही? याबाबतचा कोणताही खुलासा झालेला नाही.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री तृप्ती डिमरीने 'अ‍ॅनिमल' ( Animal Movie ) चित्रपटामध्ये 'झोया'ची (झोया वहाब रियाज) भूमिका साकारली आहे. दरम्यान तृप्ती डिमरी आणि रणबीर कपूर यांच्यात एक इंटिमेट सीन्स दाखविण्यात आला. या सीन खूपच कमी कालावधीचा आहे. मात्र, चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आणि तृप्ती फेमस झाली.

दरम्यान एका अहवालानुसार, या इंटिमेट सीन्ससाठी तृप्तीच्या आधी बॉलिवूड अभिनेत्री साराने ऑडिशन दिल्याची माहिती समोर आली आहे. आता या अफवांना पूर्णविराम देत खरं तर, साराने कधीही 'अॅनिमल' साठी ऑडिशन दिलं नसल्याचे तिच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे. मात्र, खरंच साराने ऑडिशन दिली होती की नाही? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही. यामुळे सोशल मीडियावरील चाहते अनेक तर्क- वितर्क लावत आहेत.

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपटात अनिल कपूरने बलबीर सिंग आणि रणबीरने बलबीरचा मुलगा अर्जुन सिंगची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट सध्या भॉक्स ऑफिसवर ४०० कोंटीच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news