Animal Collection Day 4 : ‘अॅनिमल’ला विकेंडचा फायदा; २५० कोटींकडे वाटचाल | पुढारी

Animal Collection Day 4 : ‘अॅनिमल’ला विकेंडचा फायदा; २५० कोटींकडे वाटचाल

पुढारी ऑनलाईन डेस्क : संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर, साऊथ स्टार रश्मिका मंदाना, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि अनिल कपूर यांचा ‘अॅनिमल’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपट रिलीज होवून फक्त चार दिवस झाले असून चित्रपटाने सोमवारी ४० कोटी रूपयांचा टप्पा पार केला आहे. तर एकूण २४२ कोटींची भरघोस अशी कामगिरी करत २५० कोटींकडे वाटचाल करत आहे. ( Animal Collection Day 4 )

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ हा विकेंटला म्हणजे, रविवारी सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने ओपनिंगच्या पहिल्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी ६३.८० कोटींची, दुसऱ्या दिवशी म्हणजे, शनिवारी ६६. २७ कोटींची आणि विकेंटच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे, रविवारी या चित्रपटाने जबरदस्त बॉक्स ऑफिसवर ७१. ४६ कोटींची कमाई केली होती. मात्र चौथ्या दिवशी चित्रपटाने कमाईचे आकडे खाली आल्याचे निदर्शनास आले.

या चित्रपटाने चौथ्या दिवशी म्हणजे, सोमवारी रात्री १० वाजेपर्यंत फक्त ४० कोटी रूपयांची कमाई केली आहे. या आकड्यावरून चित्रपटाला विकेंडचा फायदा झाल्याचे समजते. मात्र, विकेंडनंतरच्या दुसऱ्या दिवशी कमाईच्या बाबतीत तो मागे पडला. तर ‘अॅनिमल’ ने आतापर्यत एकूण २४२ कोटींची कमाई केली आहे. ( Animal Collection Day 4 )

आगामी काळात ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या कामगिरीमध्ये आणखीन गती येईल आणि ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘गदर २’ चित्रपटाना मागे टाकले अशी भावना निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान गेल्या तीन दिवसांतच २०१.५३ कोटींची टप्पा पार केला आहे. आता हा चित्रपट काही दिवसांत ३०० कोटींच्या घरात जाईल असेही बोलले जात आहे.

Back to top button