पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील 'इंडियन आयडल' ६ सीजन ( Indian Idol ६ ) शोचंr होस्ट करणारी अभिनेत्री मिनी माथुर (Mini Mathur) चर्चेत आली आहे. मिनी माथुरने नुकतेच या शोमधून बाहेर पडत असल्याची माहिती देत अनेक धक्कादायक गोष्टीचा खुलासा केला आहे.
रिपोर्टनुसार, मॉडेल आणि अभिनेत्री मिनी माथुरने नुकतेच एका मुलाखतीत 'इंडियन आयडल' ( Indian Idol ६ ) शोला रामराम करत असल्याची माहिती दिली आहे. यात तिने सांगितले की, 'मी या शो लवकरच सोडणार आहे. कारण यात कोणतेही रियॅलिटी नाही. फक्त पैसे कमवण्यावर भर दिला जातोय. मी ६ व्या सीझनपर्यत शोचं सूत्रसंचालन केले आहे. यात घडणाऱ्या गोष्टी मला अजिबात आवडलेल्या नाहीत. याशिवाय एकिकडे स्पर्धकांचे भरभरून कौतुक करावे लागते तर दुसरीकडे अचानक त्याच्या कुटूंबियांना मध्येच बोलविले जाते. परंतु, स्पर्धकांला यावेळी त्याच्या कुटूंबियाची होणारी भेटची कल्पना नसते. शोत अचानक कोणत्या तरी गोष्टी दाखवल्या जातात. यामुळे मी वैतागून शो सोडत आहे.' असे म्हटले आहे.
दरम्यान मिनीने पुढे एक किस्सा सांगताना म्हटलं की, 'पॉडकास्टमध्ये मध्येच प्रोड्यूसर्स येतात आणि धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आले आहेत असे म्हणतात. यावेळी काही मोमेन्टही कराव्या लागतात. नंतर लगेच सर्व काही पहिल्यासारखे होत असते.' असेही सांगितले आहे.
मिनी माथुरने २८ फेब्रुवारी १९९८ रोजी कबीर खानसोबत लग्न केले. लग्नानंतर मिनीने खान हे आडनाव लावणे अपेक्षित होते. मात्र, तिला 'मिनी माथूर' या नावाने ओळखले जाते. यामुळे तिला आडनाव बदलायचे नव्हते. दुसरे कारण म्हणजे, आडनाव बदलल्याने कागदोपत्री कामात खूप त्रास होणार होता. पासपोर्टपासून बँक खात्यापर्यंत सर्व अधिकृत कागदपत्रांमध्ये नाव बदलावे लागले असते. या त्रासापासून वाचण्यासाठी आडनाव बदलले नसल्याचेही तिने सांगितले.
हेही वाचा :