‘अदृश्य’ रहस्याचा शोध घेण्यासाठी रितेश, पुष्कर, मंजिरी मराठी ओटीटीवर

अदृश्य
अदृश्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : 'रौद्र', 'कुलस्वामिनी', 'इरुल-रात्र अंधारी', 'बोल हरी बोल' आणि 'थरार प्रेमाचा-अथिरन' यानंतर 'अदृश्य' या मल्टीस्टारर चित्रपटाच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. १५ मेपासून अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर या चित्रपटातील रहस्य्यांचा उलगडा होणार आहे.

ग्लॅमरस अभिनेत्री मंजरी फडणीस, हॅण्डसम हंक पुष्कर जोग, सौरभ गोखले, उषा नाडकर्णी, अनंत जोग आणि सुपरस्टार रितेश देशमुख यांनी प्रमुख भूमिका 'अदृश्य' चित्रपटात साकारल्या आहेत. या रोमांचक रहस्यमय चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा 'ताल', 'परदेस', 'कहो ना प्यार है', 'वेल कम बॅक' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचे प्रख्यात सिनेमॅटोग्राफर कबीर लाल यांनी सांभाळली आहे.

प्रोग्रेसिव्ह ब्लाइंडनेसने आजारी असणाऱ्या सायलीचा मृत्यू होतो. तर, सायलीची जुळी बहिण असणारी सानिका आपल्या बहिणीच्या मृत्यूमागचं गूढ शोधण्यासाठी प्रयत्न करते. सायलीचा मृत्यू 'हत्या की आत्महत्या' हा प्रश्न तिला शांत बसू देतं नाही. या शोधमोहिमेत अदृश्य 'व्यक्ती' की अदृश्य 'उत्तर' हा प्रश्न एका रोमांचक वळणार घेऊन जातो.

'कलाकारांची उत्तम फळी लाभलेला आणि समीक्षकांच्या कौतुकाचा वर्षाव झालेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणताना आम्हाला आनंद होत आहे. शिवाय, चित्रपटाची रहस्यांनी आणि थराराने परिपूर्ण कथा प्रेक्षकांना आवडेल असा विश्वास वाटतो. जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांपर्यत मराठी मनोरंजन पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अशी प्रतिक्रिया अल्ट्रा मीडिया आणि इंटरटेनमेंट प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news