Janhvi Kapoor : ड्रेस फाटल्याने सेफ्टी पिन लावलीय; जान्हवी ठरली Oops Moment ची बळी?

Janhvi Kapoor : ड्रेस फाटल्याने सेफ्टी पिन लावलीय; जान्हवी ठरली Oops Moment ची बळी?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून यात तिच्या धमोकादार अभिनयासोबत अॅक्शन सीन पाहायला मिळाले आहेत. मात्र, चित्रपटाच्या शुटिंग संपल्यानंतर ती त्याच्या प्रमोशनमध्ये बिझी झाली होती. याच दरम्यान तिच्या नवनवीन लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. तर सध्या आणखी एका व्हिडिओने लक्ष वेधून घेत Oops moment ची बळी ठरल्याचे वृत्त समोर आले आहे.

अनेक अभिनेत्री स्वत:ला वेगळे दाखवण्यासाठी अनेक वेळा टाईट (फिट) कपडे घालण्याचा प्रयत्न करत असतात. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणपासून मौनी रॉयपर्यंत अनेक अभिनेत्रींनी वेगवेगळी फॅशन केली, परंतु, त्याना कॅमेऱ्याच्या समोर आपला ड्रेस सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागली आहे. तर काही वेळा त्या Oops moment ला देखील बळी पडल्या. तर सध्या जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिली' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानच्या ड्रेसनं Oops moment ला बळी ठरली आहे.

अभिनेत्री जान्हवी कपूरचा नुकतेच विरल भयानी याच्या इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत जान्हवी ब्लू रंगाच्या थाई स्लिट ड़्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसतेय. परंतु, पापॉराझीच्या कॅमेऱ्याला पोझ देताना जान्हवीमध्येच तिच्या गाडीकडे पाहते. यामुळे चाहत्यांनी ती मागे वळून तिचा ड्रेस सरळ करत आहे काय? असे वाटले आहे. कारण, यावेळी जान्हावीने तिच्या ड्रेसला सेफ्टी पिनचा वापर केला आहे. ब्लू रंगाच्या ड्रेससोबत तिने केसांची स्टाईल, मेकअप, लिपस्टिक आणि सोनेरी रंगाची हाय हिल्सने लूक पूर्ण केला आहे.

हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी जान्हवीचे एकीकडे भरभरून कौतूक केले जात आहे. तर दुसरीकडे तिचा डिझायनर 'ड्रेस फाटल्याने त्याला सेफ्टी पिन लावल्यात काय?' असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. याच दरम्यान जान्हवीला 'उर्फी जावेदची कॉपी'देखील म्हटलं आहे. परंतु या व्हिडिओमध्ये खास करून जान्हवीचा ड्रेस कोठेही सरकल्याचे दिसत नाही.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ruhee Dosani (@ruheedosani)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news