नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) आपल्या फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. आता ही ती एका कारणाने चर्चेत आली आहे. कारण आहे तिने परिधान केलेला लाल रंगाचा गाऊन (Red Sequinned Gown) हा गाऊन तिने नव्या वर्षाच्या स्वागतासाठी दुबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात १५ मिनिटांसाठी घातला होता. तिला यासाठी तब्बल ४ कोटी रूपये मिळाले होते. हा गाऊन तब्बल ३२ लाखांचा आहे. आता या गाऊनची खरी किंमत लोकांच्या समोर आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा रंगली असून या गाऊनमधील रौतेलाचे (Urvashi Rautela) फोटो व्हायरल होत आहेत.
अधिक वाचा : जान्हवी कपूरने घेतलेल्या फ्लॅटची किंमत पाहून डोळे विस्फारतील!
या गाऊनची किंमत तब्बल ३२ लाख रूपये म्हणजेच ४५ हजार डॉलर्स असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तर हा गाऊन तयार करण्यासाठी १५० तासांचा कालावधी लागल्याचे ही सुत्रांनी सांगितले. हा गाऊन प्रसिद्ध डिझायनर मायकेल सिनको (Michael Cinco) याने डिझाइन केले आहे. मायकेल सिनको यांने याच्या आधी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनसाठी ड्रेस डिझाइन केले आहेत. जो ऐश्वर्याने कान्सच्या कार्यक्रमासाठी घातला होता.
उर्वशी रौतेला मोहन भारद्वाज यांच्या 'ब्लॅक रोज' चित्रपटात काम करत आहे. हा उर्वशीचा पहिला द्विभाषिक चित्रपट आहे. तर हा चित्रपट शेक्सपियरच्या 'द मर्चंट ऑफ वेनिस' नाटकावर आधारित आहे. यापूर्वी त्यांचा 'व्हर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.