![खुमासदार नात्यांचा गोडा मसाला](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F10%2F%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सगळे पुरुष सारखेच असतात' असं छोट्या पडड्यावरील 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' मधील महिलांनी घोषित केलं आहे. या मालिकेत पुरुषांशिवाय काही अडत नाही असं मानणाऱ्या या महिलांनी ते सिद्धदेखील करून दाखविलं आहे. पुरुषांचा इतका तिरस्कार करण्यामागे नेमकं कारण तरी काय असेल? हे तेंडुलकर महिला कुटुंबाशी भेट झाल्यावर पाहायला मिळणार आहे. सोनी मराठीने आपल्या मनोरंजनाच्या पिटाऱ्यातून आणखी एक मजेदार गोष्ट चाहत्यांच्या भेटीस आणली आहेत. आता 'खुमासदार नात्यांचा गोडा मसाला' या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे.
संबधित बातम्या
मुंबईतल्या उपनगरात अजूनही टिकून राहिलेलं एक जूनं बैठं घर ज्याला आसपासची लोक चेटकिणींचं घर म्हणून ओळखतात. तेच आहे तेंडुलकरांचं घर. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवांनी काहीशा पुरुषामुळे त्रस्त झालेल्या या तेंडुलकर महिला एकत्रित राहतात. पण आता या तेंडुलकर निवासात सगळ्यांचा लाडका निखिल बने याची एन्ट्री होणार आहे.
निखिल तेंडुलकर निवासात चोर म्हणून येणार आहे. सगळ्या महिला एकत्रित राहतात म्हणून इकडे सोप्या पद्धतीने चोरी करता येईल अशा उद्देशाने तो घरात शिरतो. परतु, याला घरात चोरी करता येईल का?, तेंडुलकर महिला त्यांना हाकलून लावतील? हे आता मालिकेत पहायला मिळणार आहे.
छोट्या पडद्यावरील एक विनोदी पण कारुण्याची झालर असणारी मालिका म्हणजे 'खुमासदार नात्याचा गोडा मसाला'. यामुळे या मालिकेत नेमके काय होते? हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा :