Sam Bahadur : अंगावर शहारे आणणारा Vicky Kaushal च्या ‘सॅम बहादुर’चा टीजर (Video)

Sam Bahadur
Sam Bahadur

पुढारी ऑनलाईन डेस्क : विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' चित्रपटाचा टीजर रिलीज झाला आहे. अंगावर शहारे आणणारा आणि देशभक्तीची भावना जागृत करणारा या चित्रपटाचा टीजर आहे. (Sam Bahadur) विकी कौशलचा अभिनय दमदार आहे. एकूण १.२६ मिनिटांचा हा टीजर असून प्रत्येकाने हा व्हिडिओ पाहायला हवा. (Sam Bahadur)

संबधित बातम्या-

फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्या भूमिकेत विकी आहे. आर्मी युनीफॉर्ममध्ये विकीचा लूक खूप दमदार दिसत आहे. विकीची या भूमिकेतील पहिली झलक त्याच्या फॅन्सना आवडली आहे. १ डिसेंबरला थिएटर्समध्ये चित्रपट रिलीज होईल. हा क बायोपिक आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाआधी विकीने राजीमध्ये एकत्र काम केलं होतं. विकीशिवाय फातिमा सना शेख, नीरज काबी, सान्या मल्होत्रा, जीशान आयूब मुख्य भूमिकेत आहेत.

विकीने या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. सान्याने विकीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. फातिमा सना शेख इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. विकीचा मागील चित्रपट 'द ग्रेट इंडियन फॅमिली' बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही. त्यामुळे फॅन्सना आता त्याच्याकडून अपेक्षा आहे की, सॅम बहादुर हिट ठरेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news