Nawazuddin Siddiqui : पत्‍नीच्या आरोपांवर नवाजुद्दीनने सोडलं मौन; म्‍हणाला,” मी गप्‍प…”

Nawazuddin Siddiqui with aaliya
Nawazuddin Siddiqui with aaliya
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ( Nawazuddin Siddiqui ) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्‍हा एकदा चर्चेत आला आहे.  पत्नी आलियाने त्याच्यावर घरगुती हिंसाचारसोबत बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता; परंतु नवाजुद्दीनने याबाबतची कोणताही अधिकृत माहिती दिली नव्हती. आता स्वत: या गोष्टीवर पहिल्यांदा मौन सोडत गप्प बसल्याने गैरसमज पसरत असल्याचे त्याने म्हटलं आहे.

माझे गप्प बसणे आणि शांततेमुळे गैरसमज पसरत आहेत

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने ( Nawazuddin Siddiqui ) नुकतेच त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत पत्नी आलियाने केलेल्या आरोपांबाबत मौन सोडले आहे. यात त्याने लिहिलं आहे की, "माझे गप्प बसणे आणि शांततेमुळे गैरसमज पसरत आहेत. मी आतापर्यंत गप्प आहे कारण मला माहित आहे की, माझी मुले लहान आहेत आणि त्याच्यावर वाईट गोष्टीचा परिणाम होवू नये. त्याच्यावर संस्कार चांगले व्हावेत ही अपेक्षा आहे. एका बनवलेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडिया आणि काही लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहेत.'

यादरम्यान त्याने ५ मुद्द्यांवरून आपले स्पष्टीकरण मांडत सांगितले की, "खूप दिवसांपासून पती आलिया आणि मी आमच्या मुलाच्या देखभालीसाठी एकत्रित राहत आहोत, परंतु, आमचा घटस्फोट झाला आहे. माझी मुलं भारतात असून गेल्या ४५ दिवसांपासून शाळेत का जात नाहीत? हे कोणाला माहीत आहे का?. शाळात मला रोज सुट्टीसाठी पत्रे पाठवावी लागत आहेत. माझ्या मुलांना गेल्या ४५ दिवसांपासून डांबून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे दुबईतील शालेय शिक्षण बंद झाले आहे." असेही तो म्हणाला.

पैशासाठी माझे नाव बदनाम करण्‍याचा प्रयत्‍न

यापुढे नवाजुद्दीनने आलियावर गंभीर आरोप करत म्हटले की, "आलिया पैशासाठी माझे नाव बदनाम करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी तिला दरमहा १० लाख रुपये देत आहे. याशिवाय तिच्या तीन चित्रपटांना आर्थिक मदत देखील केली आहे, जेणेकरून तिला स्वतःसाठी उत्पन्नाचे साधन मिळावे. याशिवाय माझ्या मुलांसाठी आलिशान कार दिल्या होत्या, परंतु, तिने कार घेण्यास नकार दिला. तिने स्वत: जवळचे सर्व पैसे उधळले आहेत. या कारस्थानात माझ्या मुलांनाही तिने सामील करून घेतले आहे." असेही त्याने म्हटलं आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news