AR Ameen : ए.आर. रेहमान यांचा मुलगा अमीन मोठ्या दुर्घटनेतून बचावला | पुढारी

AR Ameen : ए.आर. रेहमान यांचा मुलगा अमीन मोठ्या दुर्घटनेतून बचावला

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान यांचा मुलगा ए.आर. अमीन (AR Ameen) मुंबईतील एका सेट लोकेशनवर मोठ्या अपघातातून बचावला. 20 वर्षीय अमीनने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की, तो आणि त्याची टीम एका गाण्यासाठी शूटिंग करत असताना ही दुर्घटना घडली. सुदैवाने आम्हाला कोणतीही दुखापत झाली नाही. मी आणि आमची टीम सुखरूप आहे.

मुंबई येथील फिल्मसिटीमध्ये एका गाण्याचे शूटिंग सुरू होते. मी (AR Ameen) कॅमेऱ्यासमोर परफॉर्म करण्यावर लक्ष केंद्रित करत असताना सेटवर अगदी मध्यभागी क्रेनमधून लटकलेले संपूर्ण ट्रस आणि झुंबर खाली कोसळले. आणि त्याचा अक्षरश: चुराडा झाला. इकडे-तिकडे काही इंच झाले असते, आणि काही सेकंद आधी किंवा नंतर झाले असते. तर संपूर्ण झुंबर आमच्या डोक्यावर पडले असते.

या धक्क्यामुळे माझी टीम आणि मी शॉक्ड झालो आहोत, या आघातातून मी सावरू शकलेलो नाही. मी सर्वशक्तिमान, माझे पालक, कुटुंब, हितचिंतक आणि माझे आध्यात्मिक गुरू यांचा आभारी आहे. मी आज सुरक्षित आणि जिवंत आहे, अशी पोस्ट करत अमीनने इंस्टाग्रामवर खराब झालेल्या सेटमधील छायाचित्रे शेअर केली आहेत. दरम्यान, विमा कंपनी आणि प्रॉडक्शन हाऊसकडून या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

माझा मुलगा एआर अमीन आणि त्याची टीम फिल्मसिटी येथील मोठ्या अपघातातून बचावली. देवाच्या कृपेने कोणतीही दुखापत झाली नाही. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत, यासाठी भारतीय सेट्स आणि लोकेशन्सवर जागतिक दर्जाच्या सुरक्षिततेच्या मानकांसाठी आम्हाला हालचाली कराव्या लागतील, असे संगीत दिग्दर्शक एआर रेहमान यांनी म्हटले आहे.

आमीन पार्श्वगायक असून 2015 मध्ये तामिळ चित्रपट ‘ओ कादल कानमानी’द्वारे त्याने पदार्पण केले. त्यानंतर त्यांने विविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. त्यांने गायलेले “सूरवल्ली पोन्नू” हे गाणे लोकप्रिय झाले आहे.

हेही वाचा 

Back to top button