The Family Man ३ : प्रतीक्षा संपली! मनोज वाजपेयीचा फॅमिली मॅन ३ लवकरच येणार 

The Family Man ३
The Family Man ३
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता मनोज वाजपेयी त्याच्या 'द फॅमिली मॅन' (The Family Man ३) या वेब सीरिजमुळे नेहमीच चर्चेत असतो. अभिनेत्याच्या या मालिकेचे दोन्ही सीझन लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. मनोजच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. चाहते आता मनोजच्या मालिकेच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता अभिनेत्याने या मालिकेशी संबंधित एक मोठी माहिती शेअर केली आहे. (The Family Man ३)

बॉलिवूड अभिनेता मनोजच्या 'द फॅमिली मॅन'चे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. अलीकडेच, मनोजने एका मुलाखतीत त्याच्या आगामी वेब सीरिज 'द फॅमिली मॅन ३' बद्दल माहिती दिली. तो म्हणाला- 'आज ही सुबह एक चिड़िया उड़ते हुए मेरी खिड़की पर बैठी और हमने कहा, शायद हम लोग शूटिंग इस साल के अंत में कर सकते हैं और अगर पैसे बचाने के बाद सब सही हो गया, तो शायद कर ही लेंगे'

मनोजच्या या वक्तव्यावरून लवकर द फॅमिली मॅन ३ भेटीला येईल असे वाटते.

'फॅमिली मॅन सीझन २' चा प्रीमियर २०२२ साली आयोजित करण्यात आला होता. तो चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता. या मालिकेतील समांथाच्या अभिनयानेही सर्वांचे लक्ष वेधले होते. आता तिसऱ्या भागामध्ये निर्माते प्रेक्षकांसाठी कोणती कथा आणतात, हे पाहणे मनोरंजक असेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news