Anurag Kashyap : ‘सैराट’ बाबत अनुराग कश्यपचे धक्कादायक विधान; ‘या’ चित्रपटाबद्दल म्हणाला

Anurag Kashyap
Anurag Kashyap

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड चित्रपट निर्माता- दिग्दर्शक अनुराग कश्यप ( Anurag Kashyap ) हे सध्या चर्चेत आले आहेत. एकीकडे त्याने नुकत्याच झालेल्या मुलाखतीत 'कांतारा' चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. तर दुसरीकडे त्यांनी मराठी चित्रपट 'सैराट'बद्दल धक्कादायक विधान केलं आहे. या विधानाने सोशल मीडियात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

अभिनेता अनुराग कश्यप यांनी( Anurag Kashyap ) 'Galatta Plus' द्वारे आयोजित केलल्या एका मुलाखतील 'सैराट' आणि 'कांतारा' चित्रपटांची तुलना करताना धक्कादायक खुलासा केला. या कार्यक्रमात अनुरागसोबत 'सैराट' चे दिग्दर्शक नागराज मंजुळे देखील उपस्थित होते. यावेळी अनुराग यांनी 'एखादा चित्रपटाच्या भरघोस यशातून काय शिकले जाते हे महत्वाचे आहे. हा मुद्दा मांडला. एक तर त्यांना त्याच्या कथा सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे किंवा त्यांना त्यांची पातळी आणखी वाढवण्याची गरज आहे. या दोन गोष्टींपैकी एक शिकले जाते, असेही ते म्हणाले.

याच दरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या 'सैराट' या हिट चित्रपटाविषयी बोलताना, तुमच्या सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टी बर्बाद केली असल्याचे तुम्हाला माहिती आहे का? असा प्रश्न विचारला आहे. सैराटने भरघोस कमाई करत हिट झाला आहे. परंतु, सामान्य नागरिकांच्या मनात वेगळीच भावना निर्माण केली. या चित्रपटामुळे मुली पळून जावू लागल्या आणि अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली. या चित्रपटात जे पाहिलं गेलं तेच लोकांनी कृतीत उतरविले आहे. असे चित्रपट करणे बंद केले पाहिजे कारण लोकांच्या विचारात बदल होतो.

यापुढे त्यांनी 'कांतारा' आणि 'पुष्पा' या चित्रपटाचे कौतुक करताना ही तुमची कथा चौकटीबाहेर जाऊन सांगण्याची परवानगी देते, असेही म्हटले आहे. तर 'केजीएफ' खूपच गाजला, परंतु, त्याचा दुसरा पार्ट बनवला गेला तर ते तेवढाच चालेल की नाही यांची शंका असल्याचेही म्हटलं आहे. एकिकडे चांगल्या चित्रपटाचे त्यांनी कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे मराठी चित्रपटाबद्दल हे वक्तव्य केले. या त्याच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियात अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news