जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाची कारवाई; एका दहशतवाद्यावाला अटक

jammu & Kashmir
jammu & Kashmir

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्कर, भांडीपोरा पोलीस आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत आज (दि.१२) एका दहशतवाद्यावाला शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे. ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यावर पीएस पेठकोट येथे गुन्हा दाखल केला असल्याचे बांदीपोरा पोलिसांनी सांगितले. (Jammu & Kashmir)

'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात एका दहशतवाद्याच्या साथीदाराला शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे. चिनार कॉर्प्स भारतीय लष्कराने 'एक्स' वर ट्विट करत म्हटलं आहे, "ओपी बोनाकुट, बांदीपोरा. गुप्तचर संस्थांकडून मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी आज पेठकूट, बांदीपोरा सामान्य भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली. पुनर्प्राप्तीसह एका संशयित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. 04x पिस्तूल, 01×हँड ग्रेनेड आणि इतर युद्धासारखी शस्त्रास्त्रे ताब्यात घेतली."

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news