WHO नुसार भारतात कोव्हिडमुळे ४७ लाख रुग्णांचा मृत्यू; भारत सरकारने घेतला आक्षेप

WHO नुसार भारतात कोव्हिडमुळे ४७ लाख रुग्णांचा मृत्यू; भारत सरकारने घेतला आक्षेप

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात २०२० मध्ये ८,३०,००० आणि २०२१ मध्ये ४७,४०,८९४ पेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या आकडेवारीवर भारत सरकारने आक्षेप नोंदविला आहे. इतकंच नाही तर डब्ल्युएचओची आकडेवारीचे संकलन करण्याची आणि आकलनाची पद्धत चुकीची आहे, असल्याचे मत भारत सरकारने मांडलेले आहे.

डब्ल्युएचओच्या आकडेवारीवर आक्षेप नोंदवत भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, "जागतिक आरोग्य संघटनेची ही आकडेवारी देशातील अधिकृत आकडेवारीपेक्षा १० पटीने जास्त आहे. कारण, प्रत्यक्षात भारतात २०२० मध्ये ५ लाखांहून अधिक मृत्यू कोरोनाने झाले आहेत", असे सांगत डब्ल्युएचओची भारतातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चुकीची भारत सरकारने सांगितलेले आहे.

डब्ल्यूएचओ म्हणण्यानुसार जागतिक स्तरावर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी एक तृतीयांश मृत्यू केवळ भारतात झाले आहेत. यावर भारत सरकारने प्रत्यक्ष आकडेवारी सादर करताना म्हटले आहे की, "१ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात कोरोनामुळे ४,८१,००० मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे डब्ल्युएचओने जो आकडा जाहीर केलेला आहे, तो मूळ आकडेवारीपेक्षा दहा पटीने जास्त आहे."

या आठवड्याच्या सुरुवातीला भारत सरकारकडून नागरी मृत्यू नोंद अहवाल प्रसिद्ध केला. यात २०२० सालात ८१ लाख मृत्यू झाल्याची नोंद होती. ही आकडेवारी मागील वर्षांच्या तुलनेत ६ टक्क्याने वाढली आहे. त्यामुळे ४७४,८०६ हे अतिरिक्त मृत्यू कोव्हिडमुळे झाले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आणि त्यांनी डब्ल्युएचओची आकडेवारी नाकारली. अधिकृत आकडेवारीनुसार २०२० मध्ये भारतात कोरोनामुळे सुमारे १ लाख ४९ हजार लोक मरण पावलेत, अशी नोंद करण्यात आली आहे.

हे वाचलंत का?

पहा व्हिडीओ : भोंग्यांच्या बाबतीत कायदा काय सांगतो ? | विधितज्ज्ञ असीम सरोदे यांच्याशी बातचीत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news