महामार्ग की मृत्यूचा सापळा? अपघातात आई वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुकलीने गमावले प्राण!

महामार्ग की मृत्यूचा सापळा? अपघातात आई वडिलांसह १८ महिन्यांच्या चिमुकलीने गमावले प्राण!

कोपरगाव (अहमदनगर) : तालुक्यात समृध्दी महामार्गावर उभा असलेल्या आयशरला क्रुझर गाडीच्या जोरदार धडकेत 18 महिन्याच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू झाला असून आईचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अन्य सात जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील कोकमठान शिवारात समृध्दी महामार्गावर रात्री सव्वा एकच्या सुमारास उभा असलेल्या आयशरला क्रुझर गाडीने दिलेल्या धडकेत क्रुझर गाडीमधील पती संतोष अशोक राठोड (वय ३०), मुलगी अवनी संतोष राठोड (वय १८ महिने), या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी वर्षा संतोष राठोड (वय २७ सर्व राहणार नेर, ता. मंठा, जि. जालना) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर अन्य सातजण जखमी झाले असून त्यांच्यावर आत्मा मालिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे कुटुंब नेर येथून विरार मुंबईकडे जात असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. जालना कडुन मुंबई कडे घेवुन जात असताना क्रुझर जिप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात समोर चाललेल्या आयशर टेम्पोला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघातातील सर्वांचे मृतदेह रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविचछेदन करण्यासाठी आणण्यात आले असून पुढील तपास शहर पोलिस करत आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news