Abuse minor girl kolhapur : खाऊसाठी दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

कुरूंदवाड : पुढारी वृत्तसेवा : Abuse minor girl kolhapur : कुरुंदवाड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील एका गावात सोमवारी दुपारी किराणा दुकानदाराकडून खाऊ आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. पीडित मुलीने घडला प्रकार आईला सांगितला.

आईने गल्लीतील महिलांना सांगितला ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसरताच महिला व ग्रामस्थांच्या जमावाने दुकान गाठत दुकानदाराला बेदम चोप दिला. दुकानावर दगडफेक करत तोडफोड केल्याने गावात तणावपूर्ण वातावरण बनले. दुकानदार अभिजित सुभाष नाडगोंड (वय 35) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

Abuse minor girl kolhapur : पोलिसांनी नाडगोंडला घेतले ताब्यात

दरम्यान, स.पो.नि. बालाजी भांगे, उपनिरीक्षक किशोर खाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नाडगोंड याला ताब्यात घेतले.

परिस्थिती आटोक्यात येत नसल्याने राखीव पोलिसदलाला पाचारण करून पोलिस बंदोबस्त लावला.

पीडित मुलगी दुकानात खाऊ आणण्यासाठी गेली असता संशयित नाडगोंडाने तिला दुकानात बोलवून अतिप्रसंग केला. मुलगी रडत घरी गेली. हा प्रकार आईला सांगितला.

संतप्त झालेल्या आईने गल्लीतील महिलांच्या निदर्शनास ही घटना आणून दिल्याने संतप्त जमावाने दुकान गाठले.

नाडगोंडा हा दुकान बंद करून पळ काढत असताना महिलांनी त्याला पकडून चोप द्यायला सुरुवात केली. ग्रामस्थांच्या जमावाने नाडगोंडाला बेदम मारहाण करत दुकानावर दगडफेक केली.

गावात तणावपूर्ण वातावरण

घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी नाडगोंडाला ताब्यात घेत सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.

घडल्या प्रकाराची कसून चौकशी करून सबळ पुरावे प्राप्त करून कडक कारवाई करू, असे आश्वासन अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, इचलकरंजीचे पोलिस उपाधीक्षक बी. बी. महामुनी यांनी देत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.

गावात सध्या तणावपूर्ण वातावरण बनल्याने गावात व संशयित आरोपीच्या घरी पोलिस बंदोबस्त लावला आहे.

येथील पोलिसांत रात्री उशिरा संशयितावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news