India च्या बैठकीपूर्वी आप प्रवक्त्या प्रियंकाच्या दाव्याने खळबळ; म्हणाल्या पंतप्रधान पदासाठी केजरीवाल…

India - aap
India - aap

पुढारी ऑनलाइन डेस्क : आगामी लोकसभा 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया (भारतीय राष्ट्रीय विकासात्मक समावेशी आघाडी) आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका पार पडल्या असून लवकरच तिसरी बैठक होत आहे. मात्र, या दोन्ही बैठकीत आघाडीचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल यामध्ये एकमत झालेले नाही. प्रत्यक्ष या आघाडीतील अनेक पक्षांचे नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत, असे चित्र आहे. तिसऱ्या बैठकीच्या पूर्व संध्येला अरविंद केजरीवाल हे इंडियाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असावे, असे म्हणत आप प्रवक्त्या प्रियंका कक्कड यांनी खळबळ उडवून दिली आहे. एएनआयशी बोलताना कक्कड यांनी हे वक्तव्य केले आहे.

एएनआयने याचे सविस्तर वृत्त दिले आहे. प्रियंका या ANI शी बोलताना म्हणाल्या, मला अरविंद केजरीवाल यांना विरोधी आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार बनवायचे आहे. आपचे संयोजक जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत आणि ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाच्या सर्वोच्च पदावरील वर्चस्वाला आव्हान देणारे एक विश्वसनीय प्रतिस्पर्धी बनले आहेत. पंतप्रधानांचे शैक्षणिक रेकॉर्ड किंवा पात्रता किंवा कोणताही अन्य विषय असो, अरविंद केजरीवाल अनेक विषयांवर निर्भीडपणे आपले विचार मांडत आहेत, असे कक्कड यांनी एएनआयला सांगितले.

मुंबईत आज India ची बैठक

इंडिया आघाडीच्या या पूर्वी दोन बैठका झाल्या आहे. पैकी शेवटची बैठक ही काँग्रेसशासित कर्नाटकातील बंगळुरू येथे 17-18 जुलै रोजी झाली होती. तर पुढील तिसरी बैठक आज बुधवारी (दि. 30) उशिरा मुंबईत सुरू होणार असून गुरुवारपर्यंत ही बैठक चालणार आहे. केंद्रात भाजप-प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) विरुद्ध 26 पक्षांनी एकत्र येतले आहेत. यामध्ये काँग्रेसचाही समावेश आहे. या आघाडीची उद्घाटन बैठक बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी 23 जून रोजी पाटणा येथे बोलावली होती.

या बैठकीत पुढील राज्य निवडणुका आणि पुढील वर्षी होणाऱ्या महत्त्वपूर्ण लोकसभा निवडणुकांच्या आधी या गटाच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. या दोन दिवसांच्या बैठकीत विरोधी आघाडीचे लोगोचे अनावरण होण्याचीही शक्यता आहे. मात्र, बैठकीच्या पूर्वसंध्येला आपच्या या वक्तव्याने विरोधी गटाला अडचणीत आणले आहे.

पंतप्रधान पदासाठी इंडियातील अनेक पक्षांचे नेते इच्छुक आहेत. काँग्रेसकडून राहुल गांधी हे इंडियाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असे काँग्रेस नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तर नितीशकुमर आणि ममता बॅनर्जी हे देखील पंतप्रधान पदासाठी दावेदारीच्या शर्यतीत मागे नाहीत. त्यानंतर आता आम आदमी पक्षाकडूनही पंतप्रधान पदासाठी अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीत पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार यावरून इंडिया आघाडीतल मतभेद दिसून येण्यास सुरुवात झाली आहे, अशी राजकीय वर्तुळातील चर्चा आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news