AAP on BJP Manifesto: भाजपचे ‘संकल्प पत्र’ म्हणजे देशाला दिलेले ‘जुमला पत्र’; AAP मंत्री अतिशी

आतिशी
आतिशी

पुढारी ऑनलाईन डेस्क: आगामी लोकसभा निवडणूक २०२४ डोळ्यासमोर ठेऊन भाजपने 'संकल्प पत्र' या नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. पीएम मोदी यांच्या हस्ते भाजपच्या संकल्प पत्राचे आज (दि.१४) दिल्लीतील भाजप कार्यालयात लोकार्पण झाले. यावेळी महिला सक्षमीकरण. मोफत रेशन योजना पुढील ५ वर्षे सुरू राहील, मुद्रा लोनची मर्यादा २० लाखांपर्यंत, पाईपमार्फत प्रत्येक घरोघरी स्वस्त गॅस, ७० वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्मान योजनेचा लाभ देणार, अशा मोठमोठ्या घोषणा केल्या. मोदींच्या या अश्वासनावरून विरोधी पक्षांतील नेत्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आप नेत्या आणि दिल्लीच्या अर्थमंत्री अतिशी यांनी भाजपने देशाला 'जुमला पत्र' दिल्याचे म्हणत टीका केली आहे. (AAP on BJP Manifesto)

आप नेत्या आणि दिल्लीच्या मंत्री अतिशी मार्लेना-सिंग यांनी भाजपच्या 'संकल्प पत्र' या जाहीरनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अतिशी म्हणाल्या, "आज भाजपने संपूर्ण देशाला 'जुमला पत्र' दिले आहे. 10 वर्षे सरकार चालवूनही ते पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या वचनांपैकी एक वचन त्यांनी तरुणांना दिले होते की दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या दिल्या जातील पण आज देशातील बेरोजगारीचा आकडा या देशाच्या इतिहासात सर्वात जास्त आहे, अशी टीका देखील त्यांनी मोदी सरकारवर केली आहे. आज (दि.१४) आयोजित पत्रकार परिषदेत आप मंत्री अतिशी बोलत होत्या. (AAP on BJP Manifesto)

केवळ 8000 कोटी रुपये आयुष्मान भारतवर खर्च; मंत्री अतिशी यांची टीका

पीएम मोदी यांनी संकल्प पत्र या जाहीरनाम्यात मोठ मोठ्या गोष्टी केल्या आहेत. परंतु, संपूर्ण देशात आयुष्मान भारतावर खर्च करण्यात आलेली रक्कम ही कमीच आहे. दिल्लीचे आरोग्य बजेट 9000 कोटी रुपये आहे, पण संपूर्ण देशात केवळ 8000 कोटी रुपये आयुष्मान भारतवर खर्च झाले आहेत, अशी टीका देखील मंत्री अतिशी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर केली आहे. (AAP on BJP Manifesto)

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news