पुणे; पुढारी वृत्तसेवा: स्वारगेट सातारा रस्त्यावरील शितल लॉजमधील एका रूममध्ये सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार तरुणीचा खून झाल्याचे समजते. तरुणीचे वय अंदाजे २४-२५ च्या दरम्यान आहे. मृतदेह बाथरूम मध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.
अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा देखील अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, घटनास्थळी दाखल झाले असून, तरुणीचे ओळख पटविण्याचे काम सुरु केले आहे.
हेही वाचा