प्रेमाची कळी पुन्हा उमलणार; DDLJ थिअटरमध्ये

DDLJ
DDLJ

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे, अभिनेता शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कारण त्याचे राज आणि सिमरनची जोडी रुपेरी पडद्यावर परतत आहेत. किंग खानच्या वाढदिवसानिमित्ताने यशराज फिल्म्सने सर्वात रोमँटिक प्रेमकथा 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' ( DDLJ ) चे विशेष स्क्रीनिंग आयोजित करून सर्व चाहत्यांसोबत हा दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे.

शाहरूखचा 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' ( DDLJ ) या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग उद्या म्हणजे, २ नोंव्हेबर २०२२ रोजी देशातील अनेक पीव्हीआर, आयनॉक्स मुव्हीज आणि सिनेपोलिस इंडिया येथे स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजित केले गेले आहे. खास करून, किंग खानच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन केलं आहे. नुकतेच प्रॉडक्शन हाऊस यशराज फिल्म्सने त्याची इंस्टाग्रामवर याबाबतची माहिती देताना एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'सर्वाची आवडती प्रेमकथा सिल्वर स्क्रीनवर परत येत आहे. 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' २ नोव्हेंबर २०२२ रोजी फक्त भारतीय सिनेमांगृहात' असे लिहिले आहे.

शाहरुखच्या वाढदिवस म्हणजे चाहत्यांसाठी जणू काय उत्सव असल्यासारखा असतो. यामुळे त्याला काहीतरी वेगळं गिफ्ट देण्याचा प्रयत्न केला जातो. या वर्षी यशराज फिल्म्सने शाहरुख खानच्या चाहत्यांना हे खास गिफ्ट दिलं आहे. शाहरुखचा 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपट सर्वात अधिक काळ म्हणजे, १२०० आठवडे थियटरमध्ये चालणारा चित्रपट आहे. यामुळे या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंगचे आयोजन केलं आहे. याशिवाय शाहरुखच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाचा टीझरही त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Yash Raj Films (@yrf)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news