पुढारी ऑनलाईन डेस्क : लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला Y+ सुरक्षा (Salman Khan) पुरवली आहे. अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याचे धमकीचे पत्र मिळाले होते. यानंतर महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशी माहिती मुंबई पोलिसांकडून मिळाली आहे. तसे ट्विट एएनआय वृत्तसंस्थेने केले आहे. (Salman Khan )