नागपूर ; पुढारी वृत्तसेवा सहा वर्षीय मुलीवर भोंदूबाबाच्या सल्ल्याने उपचार करीत असतानाच एका अघोरी प्रथेचे पालन करीत मुलीला जबर मारहाण केल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा वर्षीय मुलीला भूतबाधा झाल्याच्या शंकेने आई-वडिलांनी मुलीची भूतबाधेतून मुक्तता करण्याच्या नावाखाली तिला जबर मारहाण केली. या जबर मारहाणीत या सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. या संदर्भात नागपुरातील प्रतापनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सिद्धार्थ चिमणे (वय ४५), त्याची पत्नी आणि मेहुणी यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली. अ
नागपूरच्या सुभाष नगर परिसरात राहणाऱ्या सिद्धार्थ चिमणे व त्याची पत्नी रंजना चिमणे यांना सहा वर्षीय मुलगी होती. गेले काही दिवसांपासून मुलीची अवस्था ही सतत आजारी राहणे आणि तिचे हावभाव पाहून तिला भूतबाधा झाल्याची चिमणे दांपत्यांला शंका होती. यातूनच या दाम्पत्याने एका भोंदू बाबाच्या सल्ल्याने या चिमुकलीवर वेगवेगळे उपचार सुरू केले होते.
शुक्रवार आणि शनिवारच्या दरम्यानच्या रात्री चिमणे दांपत्य आणि त्यांच्या एका महिला नातेवाईकाने घरातच भूत बाधेतून मुक्त करण्याच्या नावाखाली सहा वर्षीय मुलीला बेल्ट आणि हाताने जबर मारहाण केली. चिमुकली जबर मारहाण सहन करू शकली नाही आणि निपचित पडली. यामध्येच तिचा मृत्यू झाला.पोलिसांनी याप्रकरणी सिद्धार्थ चिमणे (वय ४५), त्याची पत्नी आणि मेहुणी यांना खुनाच्या आरोपाखाली अटक केली. अमानुष, वाईट, अघोरी प्रथा, काळ्या जादू कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपींना आज (रविवार) न्यायालयात हजर केले जाणार आहे.
सिद्धार्थ 'गाव माझा' हे यूट्युब चॅनल चालवायचा. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीवर कोणीतरी 'काळी जादू' केल्याचा संशय सिद्धार्थला होता. त्यानंतर तिघांनी काही विधी करून मुलीला कथित काळ्या जादूतून मुक्त करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी सकाळी आरोपींनी काही विधी केले. त्याअंतर्गत मुलीला वारंवार बेल्टने मारण्यात आले. या अघोरी प्रकारादरम्यान मुलीला गंभीर दुखापत झाली आणि ती घरीच बेशुद्ध पडली. आपले विधी चुकत असून मुलीची प्रकृती बिघडल्याचे आरोपींच्या लक्षात आले. त्यांनी लगेच मुलीला मेयो रुग्णालयात दाखल केले. तिची तपासणी केली असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा :