मुंबई : 153 क्रेडिट कार्डसह 4 ठग सुरतेतून अटकेत | पुढारी

मुंबई : 153 क्रेडिट कार्डसह 4 ठग सुरतेतून अटकेत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील झारखंडच्या जामतारा टोळीनंतर आता गुजरातच्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात आंबोली पोलिसांना यश आले आहे.

या टोळीतील विपुल बोधारा, प्रदीप रंगानी, आशिष बोधारा आणि जेमिश विरानी या चार मुख्य आरोपींना पोलिसांनी सुरत येथून अटक केली असून त्यांच्याकडून विविध बँकांचे 153 क्रेडिट कार्ड, चार मोबाईल, एक टॅब आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

काही दिवसांपूर्वी पॅनकार्ड अपडेटच्या नावाने एका मुंबईकराच्या बँक खात्यातून सुमारे दीड लाख रुपये दुसर्‍या खात्यात
वळते करण्यात आले होते.त्या ठगाचा शोध सुरू असताना ही चौकडी सुरतमध्ये हाती लागली. त्यांनीच हे पैसे वळते केल्याचे स्पष्ट झाले  आहे

 

 

Back to top button