पुणे : सिंहगड रोड उड्डाणपुलाचा एक पिलर पाडणार !

पुणे : सिंहगड रोड उड्डाणपुलाचा एक पिलर पाडणार !
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  सिंहगड रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची गुणवत्ता महापालिकेकडून तपासण्यात आली असून, दहापैकी एका ठिकाणच्या पिलरच्या काही भागाची गुणवत्ता निकषानुसार कमी असल्याचे निदर्शनास आले. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापालिकेने राजाराम पूल ते फनटाईम थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या उड्डाणपुलाचे काम 21 सप्टेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आले. या उड्डाणपुलाचे काम डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

उड्डाणपुलाचे काम अपेक्षित गतीपेक्षा जास्त वेगाने सुरू आहे. आतापर्यंत गोयलगंगा चौक ते संतोष हॉल चौक या दरम्यान पिलरचे काम पूर्ण झाले असून, आता त्यावर गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे, तर संतोष हॉल पासून विठ्ठलवाडी चौकापर्यंत पिलरचे काम पूर्ण झाले आहे. तसेच विठ्ठलवाडी चौकापासून ते राजाराम पूलदरम्यान पिलर उभारणीचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाचे जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबर 2024 पर्यंत उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेकडून उड्डाणपुलाच्या गुणवत्तेची वारंवार तपासणी करण्यात येते. पालिकेने नुकतीच त्रयस्थ संस्थेकडून पुलाच्या कामाच्या दर्जाची तपासणी केली. त्यात 10 ठिकाणांपैकी संतोष हॉल चौकातील पिलरच्या कामाची गुणवत्ता एम 35 असणे आवश्यक असताना ती एम 30 भरली आहे. त्यामुळे गुणवत्ता कमी असलेल्या पिलरचा वरचा 1 मीटरचा भाग पाडून पुन्हा उभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news