Sidhu Moosewala :सिद्धू मूसेवालाच्या गाण्याला १६ मिनिटात १ मिलियन व्ह्यूज

सिद्धू मूसेवाला
सिद्धू मूसेवाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला ( Sidhu Moosewala ) यांच्या हत्येनंतर 'मेरा ना' हे नवीन गाणे रिलीज करण्यात आलं आहे. गायक सिद्धू यांची २९ मे २०२२ रोजी पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी गोळीबार करून हत्या केली होती. एकीकडे त्याच्या हत्येची चौकशी कोर्टाकडून होत आहे. तर दुसरीकडे सिद्धूच्या कुंटूबियांकडून एकापेक्षा एक त्याची गाणी रिलीज करण्यात येत आहेत. आता त्याच्या 'मेरा ना' या नव्या गाण्याला अवघ्या १६ मिनिटांत १ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सिद्धू मूसेवाला ( Sidhu Moosewala ) याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नुकतेच त्याच्या कुंटूबियांनी 'मेरा ना' या नवीन गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. स्टील बँग्लेज आणि ग्रॅमी पुरस्कार विजेता बर्ना बॉयसोबत हे गाणे शूट करण्यात आले आहे. गाण्यात शहरातील मोठ- मोठ्या पोस्टरवर सिद्धू यांचे फोटो दिसत आहेत. यातून खास करून तो 'मेरा ना' या गाण्याचे बोल म्हणताना दिसतो.

सिद्धूच्या या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी त्याची आठवण काढत भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही मिनिटात या गाण्याला १३ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. हत्येनंतर हे त्याचे रिलीज करण्यात आलेले तिसरे गाणे आहे. हे गाणे सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news