मराठा आरक्षण प्रश्न मार्गी न लागल्यास विधानसभेची तयारी ताकदीने करणार : मनोज जरांगे-पाटील

file photo
file photo

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्य सरकारने 6 जूनपर्यंत मार्गी न लावल्यास विधानसभा निवडणुकीची ताकदीने तयारी करणार आहोत. यासाठी सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेतले जाईल. मी 4 जूनपासून आमरण उपोषण करणार असून पुढील दिशा ठरविण्यासाठी श्री क्षेत्र नारायणगड (जि.बीड) येथे 8 जूनला 900 एकरामध्ये मराठा बांधवांची भव्य सभा होणार आहे, असे मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत रविवारी सांगितले.

संबंधित बातम्या 

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चैत्यभुमीवर त्यांच्या स्मृतीस अभिवादन केल्यानंतर जरांगे बोलत होते. जरांगे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत ज्याला पाडायचे, त्याला पाडा, असे आवाहन मी आधीच मराठा बांधवांना केले आहे. राजकारण माझा मार्ग नाही. पणआजवरच्या सर्वच सरकारांनी मराठा समाजाला फसवले आहे. आता आम्ही 100 टक्के आरक्षणाची लढाई लढणार आहोत.

दरम्यान, मनोज जरांगे-पाटील हे चैत्यभूमी येथून शिवाजी मंदिर याठिकाणी गेले. तेथे मराठा समाज बांधवांसमवेत बैठक झाली. मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील मराठा समाज बांधव या बैठकीस उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news