आयपीएलवर 800 कोटींचेे बेटिंग; 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल | पुढारी

आयपीएलवर 800 कोटींचेे बेटिंग; 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा :  आयपीएलची रणधुमाळी सध्या सुरु आहे. आयपीएल जसे खेळासाठी चर्चेत असते तसेच त्याची सर्वाधिक चर्चा होते ती सामन्यावरील सट्टेबाजीची. सध्या संपूर्ण सट्टा बाजार ऑनलाइन झाल्याने प्रत्येक सामन्यावर आणि सामन्यातील प्रत्येक बॉलवर अवघ्या काही सेकंदात शेकडो कोटींचा डाव जगभरातून खेळला जातोय.

संबंधित बातम्या 

सध्या सुरू असलेल्या आयपीएल सीझनमध्ये दहा टीम मध्ये एकूण 74 सामने रंगणार असून प्रत्येक सामन्यावर जगभरातून 300 ते 800 कोटींच्या घरात सट्टा लावला जात आहे. या सट्टा सिंडिकेटचा व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी बुकींची साखळी देशातल्या प्रत्येक महानगरात कार्यरत आहे. सध्याच्या आयपीएल काळात 22 हजार कोटी रुपयांची उलाढाल सट्टा बाजारात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात यापेक्षा जास्त पैसा सट्टा बाजारात फिरत असल्याचा अंदाज मुंबईतल्या एका बुकीने व्यक्त केला.

सध्या सुरू असलेल्या आयपीएल सिझनमध्ये एकूण होणार्‍या 74 सामन्यांवर 22 हजार कोटींच्या घरात सट्टा लागणार असल्याची शक्यता एका आंतरराष्ट्रीयस्तरावर काम करणार्‍या बिजनेस वेबसाईटने वर्तवली आहे. मात्र, प्रत्येक्षात बेटिंग घेणार्‍या सट्टा बुकींना विचारले असता त्यांनी हा आकडा कमी असल्याची शक्यता वर्तवली आहे. उल्हासनगर शहरातील एका बुकीने, सध्या होणार्‍या प्रत्येक सामन्यावर मुंबईसह भारतातील मोठ्या महानगरातून 300 ते 800 कोटींच्या घरात सट्टा डाव लावला जात असल्याचे सांगितले.

कधी काळी कागदावर लिहून अथवा फोनवर घेतला जाणारा सट्टा बाजार आता आधुनिक झाला आहे. कुठल्याही एका टीम अथवा खेळाडूंवर बेटिंग लावण्यापासून तर प्रत्येक चेंडूवर, हंपायर निर्णयावर देखील आता ऑनलाइन बेटिंग लावता येतो. त्यास इन प्ले अथवा लाईव्ह बेटिंग म्हणतात.

बुकींची एक साखळी नेहमीच हॉटलाईनवरुन सट्टा घेत असते. सध्या आयपीएलवर बेटिंग स्वीकारण्यासाठी मुंबई परिसरातील बुकींनी तब्बल अडीच हजाराहून अधिक टोल फ्री फोन लाईन सट्टा लावणार्‍यांसाठी खुल्या केल्या आहेत. खासकरून हॉटेलमध्ये रूम घेऊन तेथून बुकिंचे हे नेटवर्क काम करतेे.

इन प्ले बेटिंगवर सर्वाधिक सट्टा खेळ सुरू असताना पुढील चेंडूवर अथवा खेळाडूंवर ऑनलाइन बेटिंग लावण्याच्या पद्धतीस इन प्ले अथवा लाईव्ह बेटिंग असे म्हणतात. सध्या अशा इन प्ले बेटिंगला सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे एका बुकीने सांगितले. इन प्ले बेटिंगसाठी बेटिंग स्वीकारणार्‍या वेबसाईट कंपन्यांनी खास ऑप्शन दिले आहेत. त्यात मॅच विनर, पहिल्या डिलिवरीवर रन, प्रति ओव्हर रन, प्रति ओव्हर रन, नेक्स्ट मॅन आउट, हायस्ट ओपनिंग पार्टनरशिप, प्लेयर्स इनींग रन असे ऑप्शन देण्यात आले आहेत. सट्टेबाज कुठल्याही ऑप्शनला निवडून काही मिनिटे अगोदर त्यावर बेटिंग लावू शकतो, अशा पद्धतीने कोट्यवधींचे व्यवहार होत आहेत.

Back to top button