Shehnaaz Gill : शहनाज- गुरुची केमिस्ट्री पाहून नेटकऱ्यांची खटयाळ कॅमेन्ट; शहनाजसोबत लग्न कर

Shehnaaz Gill
Shehnaaz Gill

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल ( Shehnaaz Gill ) अभिनयासोबत तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते. शहनाज बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर पंजाबी गायक गुरु रंधावासोबत म्युझिक अल्बममध्ये दिसत आहे. याच दरम्यान शहनाज आणि गुरूच्या फोटोशूटचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात दोघांची केमिस्ट्री पाहून चाहत्यांनी हटके कॉमेन्टस केल्या आहेत. यात एका युजर्सने तर चक्क गुरूला लग्न करण्याचा सल्ला दिला आहे.

शहनाज गिल ( Shehnaaz Gill ) आणि गुरु रंधावा दोघांच्या इंन्स्टाग्रामवर एका फोटोशूटचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत शहनाजने गडद लाल रंगाचा वनपीसमध्ये ग्लॅमरस तर गुरू व्हाईट सूटमध्ये दिसतोय. दोघांनी हे फोटोशूट समुद्राच्या कडेला असणाऱ्या एका खडकावर केलं आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी 'You are only allowed to look at @shehnaazgill during the shoot.?? Moon is rising on 10th January 2023.' असे लिहिले आहे. या कॅप्शनवरून दोघांचे लवकरच आगामी गाणे रिलीज होण्याची शक्यता आहे.

यातील खास म्हणजे, यावेळी शहनाजचा वनपीसला कट असल्याने तिचे पाय दिसत होते. हे कदाचित गुरूला आवडले नाही त्याने लगेच तिच्या पायांवर ड्रेस झाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, पुन्हा थोड्या वेळाने शहनाजने स्वत: च्या पायावरून ड्रेस सरकवला आणि रोमॉन्टिक होवून गुरूकडे पाहत राहिली. यानंतर रोमॉन्टिक मूडमध्येच दोघेजण जोरजोरात हसतात. असे या व्हिडिओत दाखविण्यात आलं आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भऱभरून त्याच्यांवर कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. याच एका युजर्सने चक्क गुरूला शहनाजशी लग्न करण्याचा सल्ला दिला आहे. दुसऱ्या काही युजर्सने 'ohhh let's goooo??❤️', 'After Sid mujhe lgta hai ki guru shehnaaz is perfect for each other', 'Jalwa hai shehnaaz ka ?❤️', 'Omg ?' , 'So cute, ?haaaye kinne sone lagde hain dono….. Two sweethearts together….. Sugar filled moment ❤️❤️', 'Soooo cute ??? idhar dekho ???', 'Wow❤️', 'Awww… Aap dono ek saath Kitne pyaare lag rahein hain ??❤️'. यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्ट सेक्शन बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास साडेआठ लाखांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Guru Randhawa (@gururandhawa)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news