माळशेज घाटात दरड कोसळली ; आयशर ट्रक बचावला

माळशेज घाटात दरड कोसळली ; आयशर ट्रक बचावला

ओतूर : पुढारी वृत्तसेवा : नगर-कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात मंगळवारी (दि. १८) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळल्याने मोठ्या प्रमाणात राडारोडा रस्त्यावर आला आहे. दरड कोसळण्याच्या दरम्यान एक आयशर ट्रक मार्गस्थ होत असतानाच दरड कोसळली. यामध्ये ट्रकचे किरकोळ नुकसान वगळता ट्रक बालंबाल बचावला आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शी सचिन सुदाम तांबे यांनी सांगितले.

माळशेज घाटात गेली आठ दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून दाट धुके देखील आहे. दरवर्षी पावसाळ्यात माळशेज घाटात दरडी कोसळण्याच्या घटना या घडतच असतात. परिणामी प्रवाशांनी प्रवास करताना संभाव्य अप्रिय घटना टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news