मनीष सिसोदियांना धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

मनीष सिसोदियांना धक्का, दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपचे नेते मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने आज (दि.३) फेटाळला.  मद्य घाेटाळा प्रकरणी सिसोदिया अटक करण्यात आली होती. दिल्ली सरकारने १७ नोव्हेंबर २०२१ रोजी हे धोरण लागू केले, परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सप्टेंबर 2022 च्या शेवटी ते मागे घेण्यात आले हाेते.

न्यायमूर्ती दिनेश कुमार यांनी मनिष सिसोदिया यांच्या व्यतिरिक्त, उद्योगपती अभिषेक बोईनापल्ली, मद्य कंपनीचे व्यवस्थापक मेसर्स पेर्नोड रिचर्ड बेनॉय बाबू आणि 'आप'चे माजी संपर्क प्रभारी विजय नायर यांच्या याचिकाही फेटाळल्या. सिसोदिया यांनी पत्नीच्या बिघडलेल्या प्रकृतीसह विविध कारणांवर जामीन मागितला होता.

ईडीने सिसोदिया यांच्यासह अन्य आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. जामीन फेटाळण्यात आलेले सर्वांची आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु होती. सिसोदिया यांना या घोटाळ्यातील कथित भूमिकेसाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २६ फेब्रुवारी रोजी प्रथम अटक केली होती आणि तेव्हापासून ते कोठडीत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news