नागपूर : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात येऊन ५८ वर्षीय महिलेवर बलात्कार

नागपूर : पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात येऊन ५८ वर्षीय महिलेवर बलात्कार
Published on: 
Updated on: 

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : चाकूचा धाक दाखवून ५८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ५८ वर्षीय महिला घरात एकटीच होती. दोघे जण पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले. यानंतर दोघांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यानंतर महिलेला धमकी देऊन आरोपी पसार झाले.

बुधवारी सकाळी पीडितेने शेजार्‍यांना घडलेली सर्व घटना सांगितली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहू हे घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिराने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पूर्वीही असाच प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. परंतु, त्यावेळी तक्रार करण्यात आली नव्हती. तर भीतीपोटी काहीजण तक्रार करत नाहीत. त्यामुळे आरोपींची हिंमत आणखी वाढते असे पोलीसांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news