ठाणे : रिक्षात सीटवर बसला ५ फुटी अजगर (व्हिडिओ)

अजगर
अजगर

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : एखाद्या प्रवाशांनी रिक्षाचा आसरा घेण्याऐवजी एका अजगरानेच रिक्षाचा आसरा घेतल्याची घटना टिटवाळा येथे घडली आहे. ५ फुटी अजगराला पाहताच रिक्षा चालकांनी तेथून पळ काढला. सर्पमित्रानी अजगर पडकल्याचे पाहून रिक्षा चालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला.

सध्या पावसाळ्यात विषारी – बिनविषारी साप रस्त्यावर येत असल्याचा अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना टिटवाळा येथे घडली असून ५ फुटी अजगर एका रिक्षात बसल्याचे आढळून आले. त्यानंतर रिक्षा चालकाने त्वरित वॉर फाऊंडेशनच्या सर्पमित्र सागर म्हात्रे यांना संपर्क साधला. या घटनेची मिळताच सागर घटनास्थळी दाखल झाले् आणि अजगराला रेस्क्यू करत रिक्षातून पकडून त्याला एका ड्रममध्ये बंद केले. अजगर पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

यानंतर या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गाच्या सानिध्यात सोडून अजगराला मुक्त करण्यात आले. अजगराला निसर्ग मुक्त करताना वॉर फाऊंडेशन अध्यक्ष योगेश कांबळे, प्राणी मित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला, रोमा त्रिपाठी, वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे व वनरक्षक दळवी उपस्थित होते.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news