सोलापूर : राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला साडी भेट | पुढारी

सोलापूर : राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला साडी भेट

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर राष्ट्रवादी महिला आघाडीकडून सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भावाकडून बहिणीला साडीची भेट पाठविली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी काय झाडी, काय डोंगार, काय होटल…समदं कस ओक्के मधे हाय….हा डॉयलॉग अख्खा देशभर गाजवणारे सांगोल्याचे आ. शहाजीबापू पाटील यांनी आपण आपल्या पत्नीला एवढ्या वर्षात लुगडं (साडी) घेऊ शकलो नाही असे सांगितले होते. हे ऐकल्यानंतर सर्वसामान्य महिलांना अतिशय वाईट वाटलं. त्यामुळे सोलापूर राष्ट्रवादी महिला आघाडीकडून आ. पाटील यांच्या पत्नीला अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत एका भावाकडून बहिणीला साडीची भेट पाठविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राष्ट्रवादी महिला आघाडीकडून वर्गणी काढून साडी खरेदी केली.

यानंतर शुक्रवारी (दि.२२) रोजी सकाळी रेल्वे स्टेशन येथील मुख्य पोस्ट कार्यालयात राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे, सुनिता रोटे, नलिनी चंदेले, लता ढेरे, लता फुटाणे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी एकत्र जमून पोस्टाने त्यांना साडी पाठवून दिली. यावेळी महिला आघाडीकडून काय साडी, काय पदर, काय कलर…एकदम ओक्केमध्ये हाय अशा घोषणा दिल्या.

हेही वाचलंत का? 

Back to top button