पतीकडून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी, ८७ वर्षीय वृद्धेने हेल्पलाइनवर नोंदवली तक्रार

पतीकडून वारंवार शारीरिक संबंधाची मागणी, ८७ वर्षीय वृद्धेने हेल्पलाइनवर नोंदवली तक्रार

पुढारी डेस्क : गुजरातमध्ये महिलांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर १८१ अभयम (181 Abhayam) कार्यरत आहे. या नंबरवर एक विचित्र स्वरुपाची तक्रार आली आहे. वडोदरा येथील एका ८७ वर्षाच्या वृद्ध महिलेने तिच्या ८९ वर्षीय वृद्ध पतीच्या विरोधात या हेल्पलाइनवर फोन करत तक्रार नोंदवली आहे. ही तक्रार ऐकून अभयम टीम चकित झाली. नवरा पुन्हा पुन्हा शारीरिक संबंधाची (sex) मागणी करत असून यामुळे आपण हैराण झाले असल्याची वृद्ध पत्नीची तक्रार आहे. तिच्या या तक्रारीनंतर अभयमच्या टीमने वृद्ध पतीला योगा करण्याचा सल्ला दिला.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, महिलेच्या तक्रारीनंतर अभयम टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि महिलेच्या पतीला योगाचा मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला. अभयम टीमच्या मदतीनंतर सदर वृद्द महिलेला दिलासा मिळाला असून तिला पतीने त्रास देणे बंद केले आहे. अभयम टीमला एक फोन आला आणि तो एका सधन कुटुंबातील होता. कॉल ऐकून टीम चकित झाली. कारण कॉल करणारी महिला ८७ वर्षीय होती. या वयात पती नको तो हट्ट धरत असून त्यापासून माझी सुटका करावी, अशी विनंती तिने केली.

पतीचे वय ८९ वर्षे आहे आणि तो एक अभियंता आहे. तो वडोदरातील सयाजीगंज भागात राहतो. तो त्याच्या वृद्ध पत्नीकडे शारिरीक संबंधाची मागणी करत होता. यावर उपाय म्हणून त्यांना जाणीव करुन देण्यात आली की जोडप्याने वैवाहिक जीवनात अनेक वर्षे निरोगी शारीरिक संबंध ठेवले आणि आता ते त्यांचा मुलगा आणि सून यांच्यासोबत राहतात. पत्नीने अभयम टीमसोबत काही गोष्टी शेअर केल्या. पतीकडून होणारी शारिरिक संबंधाची मागणी नाकारल्यावर पती त्याचा संयम गमावेल. तिच्यावर ओरडेल आणि ते आपल्याला सहन होणार नाही.

आजारी आणि थकलेली असूनही पती शारीरिक संबंधाची मागणी करत असल्याने पत्नीने हेल्पलाइनवर फोन करुन आपली समस्या मांडली होती. त्यानंतर अभयमची टीम त्याच्या घरी पोहोचली आणि त्याचे समुपदेशन केले. अभयम टीमने सल्ला दिला की, पतीने या वयात योगाभ्यास करावा तसेच धार्मिक स्थळांना भेटी द्याव्यात. इच्छा आणि मन वळवण्यासाठी त्यांना ज्येष्ठ नागरिकांच्या उद्यानांना आणि पार्कसना (senior citizen's gardens and parks) भेट देण्यासही सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news