Weather Update : यंदा मान्सून चांगला; मात्र दोन मोठे खंड सोसावे लागतील

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुणे : पुढारी वृत्तसेवा : यंदा मान्सून चांगला बरसणार असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दहा दिवसांचे खंड सोसावे लागणार असल्याचा दावा पुण्यातील तज्ज्ञ डॉ. राघवेंद्र गायकैवारी यांनी केला आहे. डॉ. गायकैवारी हे उद्योजक असून ते गेल्या सात वर्षांपासून वेदांमधील पर्जन्यमानाचे अंदाज या विषयावर अभ्यासपूर्ण संशोधन करीत आहेत. त्यांनी भारतात पाचव्या शतकात होऊन गेलेले थोर गणितज्ज्ञ वराहमिहीर यांच्या ग्रंथांचा आधार घेत पावसाचे मॉडेल तयार केले आहे.

त्यांच्या दाव्यानुसार यंदा मान्सून चागंला होईल मात्र, 15 ते 27 ऑगस्टदरम्यान बारा दिवसांचा तर सप्टेंबरमध्ये 17 ते 22 दरम्यान सहा दिवसांचा खंड पडणार आहे. डॉ. राघवेंद्र गायकैवारी म्हणाले की, होळी, संक्रांत आणि अक्षय्य तृतीया या सणांच्या दिवशीच्या वार्‍याची स्थिती गाणितीय पद्धतीने काढून त्यावरून हे अंदाज बांधले आहेत, ते गेल्या सात वर्षांत बरोबर आले. यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. उत्तर भारतात अतिवृष्टी होईल, तर दक्षिण भारतात सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस पडेल.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news