Chandrababu Naidu’s Roadshow : आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबु नायडू यांच्या रोडशोमध्ये चेंगराचेंगरी; ८ लोकांचा मृत्यू

Chandrababu Naidu’s Roadshow : आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबु नायडू यांच्या रोडशोमध्ये चेंगराचेंगरी; ८ लोकांचा मृत्यू
Published on
Updated on

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगु देसम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकुरू येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी संध्याकाळी नायडू यांची मोटारगाडी परिसरातून जात असताना चंद्राबाबू यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली दरम्यान ही घटना घडली. या घटनेबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक लोक उघड्या ड्रेनेज कॅनॉलमध्ये पडले होते, त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेकजण जखमी झाले आहेत. (Chandrababu Naidu's Roadshow)

या चेंगराचेंगरीतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्राबाबू नायडू यांनी घटनेनंतर लगेचच कार्यक्रम थांबवला आणि मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींवर चांगले उपचार व्हावेत, अशी विनंतीही त्यांनी संबधित डॉक्टरांना व पक्षाच्या इतर नेत्यांना केली आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news