Women’s T20 WC : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर! ‘या’ 15 खेळाडूंना मिळाली संधी

Women’s T20 WC : टी-20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघ जाहीर! ‘या’ 15 खेळाडूंना मिळाली संधी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Women's T20 WC Team India : बीसीसीआयने बुधवारी (28 डिसेंबर) महिला टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आहे. तर स्मृती मानधना संघाची उपकर्णधारपदी असेल. 15 सदस्यीय संघात अष्टपैलू शिखा पांडेचे संघात पुनरागमन झाले असून फिटनेसच्या आधारावर पूजा वस्त्राकरचाही संघात समावेश करण्यात आला आहे. 10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. यासोबतच दक्षिण आफ्रिकेत जानेवारीत होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीही संघाची घोषणा करण्यात आली आहे.

टी-20 विश्वचषकात भारतीय संघ 12 फेब्रुवारीला केपटाऊनमध्ये पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप-2 मध्ये टीम इंडियासह इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि आयर्लंड या संघांचा समावेश आहे. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. विश्वचषकाचा अंतिम सामना 26 फेब्रुवारी रोजी केपटाऊन येथे खेळवला जाईल.

तीनवेळा गाठली उपांत्य फेरी

टीम इंडियाला अद्याप महिला टी-20 विश्वचषक जिंकता आलेला नाही. 2009, 2010 आणि 2018 मध्ये टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली होती. विक्रमी चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाचा या फॉरमॅटवर सुरुवातीपासूनच दबदबा आहे. ऑस्ट्रेलियाने 2010, 2012, 2014 आणि 2018 विश्वचषक जिंकले आहेत.

द. आफ्रिका, भारत, वेस्ट इंडिज यांच्यात रंगणार तिरंगी मालिका…

टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया तिरंगी मालिकेत सहभागी होणार आहे. याची सुरुवात 19 जानेवारीपासून होणार आहे. यामध्ये भारताशिवाय द. आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे संघ सहभागी होणार आहेत.

टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (यष्टीरक्षक), रिचा घोष (यष्टीरक्षक), जेमिमा रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, दीपिका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे.

राखीव खेळाडू : एस मेघना, स्नेह राणा, मेघना सिंग.

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), यस्तिका भाटिया, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवानी, सुषमा वर्मा (विकेटकीपर), अंजली सरवानी, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, एस मेघना, स्नेह राणा आणि शिखा पांडे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news