Jalgaon News | दूषित पाण्यामुळे 30 जणांना मोठा वाघोद्यात गॅस्ट्रोची लागण, उपचार सुरु | पुढारी

Jalgaon News | दूषित पाण्यामुळे 30 जणांना मोठा वाघोद्यात गॅस्ट्रोची लागण, उपचार सुरु

जळगाव पुढारी वृत्तसेवा- रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे दुषीत पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. गावातील २० ते ३० जणांवर रूग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. तर काहींना उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर अजय रिंढे यांनी दिली आहे.

या भागातील नागरिकांना लागण

  • वाघोदा गावातील गणेश नगर
  • आंबेडकर नगर
  • मोठा वाडा
  • बेघर वस्ती
  • रमाई नगर

या भागात गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

नेमकं कशामुळे ?

दूषित पाण्यामुळे किंवा ऊन लागल्यामुळे रुग्णांना ही लक्षणे जाणवत असल्याचा प्राथमिक अंदाज खाजगी डॉक्टरांकडून वर्तवला गेला आहे. मात्र वरील सर्व भागांत रूग्ण आढळल्याने दि. 21 रोजी दुपारी 3 वा डॉक्टर व अधिकारी यांचा ताफा हजर झाला. त्यांनी सर्व आरोग्य सेवक व ग्रामपंचायतीकडुन संपुर्ण माहीती घेतली व गावात पाणी तपासणीच्या सुचना दिल्या. तेव्हापासुन आरोग्य केंद्रात गावातील गॅस्ट्रोस्रदृश्य आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करणे चालू असून पाण्याची ओटीए तपासणी देखील चालू करण्यात आली आहे.

औषधोपचार उपलब्ध असल्याची माहिती

वाघोदा गावात सोय व औषधी उपलब्ध नसल्याचे काही रुग्णांना निंभोरा रुग्णालयात पाठवण्यात आले. वाघोदा आरोग्य केंद्रात जागा नसल्याचे रुग्णांसाठी मंडप गादीची तत्काल व्यवस्था करण्यात आली. कुणालाही गॅस्ट्रो सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित वाघोदा येथील उपआरोग्य, आयव्हीं व औषधोपचार उपलब्ध असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी अजय रिंढे यांनी सांगितले आहे. तसेच ग्रामपंचायतीला गावातील लिकेज बंद करण्याचा सूचना व पाण्याच्या टाकीमध्ये क्लोरीन टाकण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी वाघोदा येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ, धापटे. जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. बाळासाहेब वाभळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजय रिंढे, डॉ. सचिन ठाकुर लोहारा, डॉ. निरज पाटील चिनावल, आरोग्य विस्तार अधिकारी अब्दुल दस्तगीर, तालुका आरोग्य सहाय्यक राजेश खैरनार यांनी भेट दिल्या व सर्व माहीती घेऊन सुचना दिल्या.

हेही वाचा –

Back to top button