छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारे महाविकास आघाडीचे लोक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराला विरोध करणारे महाविकास आघाडीचे लोक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर ; पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव शहराच्या नामांतराला विरोध करणाऱ्या याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्या आहेत. हा जनतेचा विजय आहे. या नामांतराच्या विरोधात कोर्टात जाणारे लोक हे महाविकास आघाडीचे होते, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी जिथे जातो तिथे मला यश मिळते आज इथेही यश मिळाले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहर औरंग्याचे झाले पाहिजे अशी काही लोकांची इच्छा होती, परंतु कोर्टाच्या निर्णयामुळे त्यांना यश आले नाही असेही शिंदे म्हणाले.

गेले दोन दिवस मी इथे लोकसभा निवडणुकीसाठी ठाण मांडून आहे. ज्याचा कार्यक्रम करायचा होता त्याचा करेक्ट कार्यक्रम मी करणार असून, इथे महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे हे निवडून येतील असा दावाही त्यांनी केला.

हेही वाचा : 

Back to top button