छत्रपती संभाजीनगर : पुन्हा गॅस टँकरचा अपघात; सुदैवाने गॅस गळती नाही | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पुन्हा गॅस टँकरचा अपघात; सुदैवाने गॅस गळती नाही

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा छत्रपती संभाजी नगर येथील सिडको भागात तीन महिन्यांपूर्वी गॅस टँकरला अपघात होऊन मोठ्या प्रमाणावर गॅस गळती झाली होती. त्यामुळे या परिसरात कलम 144 लागू करून सर्व आस्थापना दिवसभर बंद ठेवण्यात आल्या होत्या. ही घटना ताजी असतानाच आज (मंगळवार) छत्रपती संभाजीनगरात पुन्हा एकदा गॅस वाहून येणाऱ्या टँकरला अपघात झाला. ही घटना बीड बायपास रोडवरील एमआयटी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावर घडली. सुदैवाने यात गॅस गळती झाली नाही. मात्र या घटनेमुळे तीन महिन्यांपूर्वीच्या महाभयंकर घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या.

गॅस वाहून येणारा एचपी कंपनीचा एक भला मोठा टँकर मंगळवारी पहाटे बीड बायपास रोडवरील एमआयटी कॉलेज समोरुन पैठण रोडकडे जात होता. या टँकरची समोरच्या वाहनाला जबरदस्त टक्कर झाली. त्यामुळे टँकरचा समोरील भाग( केबिन) पूर्णपणे चक्काचूर झाला. टँकरचा पाठीमागील भागही रस्त्यावर आडवा झाला. सकाळी नऊ वाजेपर्यंत या टँकरजवळ प्रशासन किंवा पोलीस यंत्रणा यापैकी कोणीही पोहोचलेले नव्हते. एचपी कंपनीचे काही कर्मचारी या ठिकाणी हजर होते, मात्र त्यांनी हा गॅस टँकर रिकामा असल्याचा दावा केला.

हेही वाचा : 

Back to top button