कन्नड चित्रपट ‘777 चार्ली’ चित्तारा स्टार पुरस्काराने सन्मानित

कन्नड चित्रपट ‘777 चार्ली’ चित्तारा स्टार पुरस्काराने सन्मानित

पुढारी ऑनलाईन डेस्क : कन्नड चित्रपट '777 चार्ली' गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला नुकतेच दोन चित्तारा स्टार पुरस्कार मिळाले आहेत. चार्ली द लॅब्राडोरला दोनपैकी एक पुरस्कार मिळाला. तर चार्लीला 'सर्वोत्कृष्ट परफॉर्मर' या पुरस्काराने गौरविण्यात आले.

किरणराज के दिग्दर्शित '777 चार्ली' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या चित्रपटात रक्षित शेट्टी, संगीता शृंगेरी, राज बी शेट्टी आदी कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. चित्रपट रिलीज झाल्यानंतर समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगली समीक्षा मिळाली. 13 व्या दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड करण्यात आली होती. यावेळी किरणराजला 'सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चित्रपटाच्या सोशल मीडिया टीमने पुरस्काराच्या ट्रॉफीसोबत कलाकारांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर चित्रपटाच्या टीमवर कौतुकांचा वर्षाव होऊ लागला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news