Nashik Crime News | इंद्रजाल, घोरपड अवयव विक्रीचा डाव उधळला | पुढारी

Nashik Crime News | इंद्रजाल, घोरपड अवयव विक्रीचा डाव उधळला

नाशिक: पुढारी वृत्तसेवा
वनविभागाने नांदगाव तालुक्यातील अस्वलदरा येथे कारवाई करत एका संशयिताकडून इंद्रजाल वनस्पती व घोरपडीच्या अवयवांची जोडी ताब्यात घेतली आहे. हे साहित्य संशयित विक्रीच्या प्रयत्नात असल्याचे तपासात उघड झाले आहे. या मुद्देमालाची अंदाजीत किंमत ३० लाख रुपये देण्यात आली आहे. आदेश खत्री पवार असे संशयिताचे नाव आहे.

वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नांदगाव तालुक्यातील अस्वलदरा येथे घोरपडीची जोडी आणि इंद्रजाल वनस्पती विक्रीस येणार असल्याची गुप्त माहीती मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने सापळा रचत जागेवर छापा मारला असता संशयित आदेश पवार आणि आणखी एक व्यक्ती संशयास्पद आढळले. चौकशी केली असता त्यांच्याकडे घोरपडीच्या अवयवांच्या जोडीचे ७८१ नग आणि इंद्रजाल वनस्पती (१९.५४८ किलो) आढळून आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संशयितास तातडीने ताब्यात घेतले. संशयिताच्या सोबतची व्यक्ती पळून जाण्यास यशस्वी झाली.

संशयितास ताब्यात घेउन त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या ९,३९,४०,४८ए,४९बी, ५०, ५१ या कलमांन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. संशयितास न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक उमेश वावरे, सहा. वनरक्षक अक्षय म्हेंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी नांदगाव एस. एस. ढोले करीत आहेत.

हेही वाचा:

Back to top button