Nashik Temperature | काळजी घ्या! नाशिक तापलय, पारा ३८.४ अंशांवर; कडाका अधिक वाढण्याचा अंदाज | पुढारी

Nashik Temperature | काळजी घ्या! नाशिक तापलय, पारा ३८.४ अंशांवर; कडाका अधिक वाढण्याचा अंदाज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
एप्रिल महिन्याच्या मध्यात नाशिकच्या तापमानात वाढ कायम आहे. रविवारी (दि.१४) शहरातील पारा थेट ३८.४ अंशांवर जाऊन पोहोचला. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने नागरिक घामाघूम झाले आहेत.

गेल्या आठवड्यापासून नाशिकच्या तापमानात चढ-उतार कायम आहे. त्यातच आता पारा थेट ३८ अंशांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. परिणामी तीव्र उकाडा जाणवत असून, दुपारी १२ ते ४ यावेळेत सर्वाधिक उन्हाचा चटका बसतो. उन्हाच्या झळांमुळे नाशिककरांनी सुटीचा दिवस असूनही घराबाहेर न पडणे पसंत केले. वाढत्या उकाड्यामुळे एसी, फॅन, कूलर सुरू झाले. दरम्यान, ग्रामीण भागही उन्हाच्या झळांनी पोळून निघत आहे. जनजीवनावर त्याचा स्पष्ट परिणाम जाणवत आहे. उन्हाचा तडाखा बघता बळीराजाकडून शेतीची कामे पहाटेच्या वेळी किंवा दुपारी चारनंतर उरकण्यावर भर दिला जात आहे. येत्या काळात उन्हाचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा:

Back to top button